- देवगांव तांडा येथे यापूर्वी संत सेवालाल महाराज यांचे मंदिर नव्हते तसेच बंजारा समाजातील नागरिकांची तळमळ पाहुन धार्मिक कामात आपलाही सहभाग असावा या प्रेरणेने आम्ही पति - पत्नीने हा निर्णय घेऊन हि जागा मंदिरासाठी मोफत दान दिली आहे. - कमल संतोष बोन्द्रे (शेतकरी महिला)
पैठण : पैठण तालुक्यातील देवगांव तांडा येथे यापूर्वी संत सेवालाल महाराज यांचे मंदिर नव्हते तसेच बंजारा समाजाची सुद्धा याठिकाणी भव्य मंदिर व्हावे अशी इच्छा होती. समस्या होती ती फक्त जागेची.
जगाला क्रांतिकारी विचारांची देणगी दिलेले संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या विचाराने प्रभावित होऊन तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून तांड्यातील ग्रामस्थांची दररोजची तळमळ पाहून तसेच आपण तांड्यावरील बंजारा समाजासाठी काही तरी करावे या उद्देशाने देवगांव येथील कमल संतोष बोन्द्रे या शेतकरी महिलेने आडूळ बु. पैठण शिवारातील त्यांच्या मालकीची २ गुंठे जमिन देवगांव तांड्यावर संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासाठी दान स्वरूपात दिलेली आहे.
ग्रामस्थांच्या वतीने लवकरच मंदिराचे बांधकाम सुरु होणार आहे. मंदिराचे पक्के बांधकाम होणार असल्याने आडूळ ते देवगांव तांडा रस्त्यावर हे भव्य मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. ग्रामस्थांची दररोजची दर्शनासाठी होणारी पायपीठ थांबल्याने तांड्यावरील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून ग्रामस्थांनी शेतकरी महिलेचे आभार मानले आहेत.
कमल बोन्द्रे या महिलेने संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासाठी त्यांच्या मालकीची जागा दान दिल्याने या महिलेचे सर्वत्र स्वागत होत आहे. संत सेवालाल महाराजांचे तालुक्यातील दुसरे मंदिर देवगांव तांडा येथे उभारले जाणार आहे.