Breaking News

10/recent/ticker-posts

लोकवर्गणीतून रामनगर तांडा येथे सार्वजनिक अभ्यासिका केंद्राची स्थापना

लोकवर्गणीतून रामनगर तांडा येथे सार्वजनिक अभ्यासिका केंद्राची स्थापना

आपल्या महाराष्ट्रातील तमाम ग्रामस्थांना कळकळीची विनंती करतो.

अभ्यासिका केंद्र हा उपक्रम आपण ही आपल्या गावात तांड्यात राबवूया...

आपल्या पाल्याचे  भवितव्य उज्ज्वल करूया - नितीन रमेश जाधव

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.आजच्या काळात स्पर्धेत टिकावयाचे असेल तर अभ्याशिवाय उपाय नाही.रामनगर तांड्यातील मुली-मुल अभ्यास करण्यासाठी वाशिम येथे राहत असतं.त्यांना आर्थिक अडचणी बरोबर असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत होते. एकंदरित गावातील सुशिक्षित व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक अभ्यासिका केंद्राची मागणी ग्रामस्थांकडे करत होते.

लोकवर्गणीतून रामनगर तांडा येथे सार्वजनिक अभ्यासिका केंद्राची स्थापना

बघितलेलं स्वप्न अखेरीस साकार झाले. रविवार दिनांक १६ जून रोजी सार्वजनिक अभ्यासिका केंद्राची स्थापना लोकवर्गणीतून रामनगर (जोडगव्हाण) तांडा येथे मा. श्री. दिलीपरावजी जाधव साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच मा‌.श्री. सुधाकरजी चव्हाण सरपंच ग्रामपंचायत जोडगव्हाण रामनगर यांच्या हस्ते उद्घाटन करून अभ्याससिका केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी गावातील नवतरुण, स्पर्धा परीक्षाची तयार करणारे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यामुळे खरोखरच होतकरू आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नवोदित उपक्रमाचे इतर ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. चालू केलेल्या अभ्यासिका केंद्र कायमस्वरूपी चालवणे आव्हानात्मक कार्य ग्रामस्थांपुढे राहणार आहे. नक्कीच या आदर्शदाही नवोदित उपक्रमाचा लाभ गावातील नवतरुण पिढीला होईल. नवतरूणांना योग्य वळण लागले आहे, त्यामुळे पत्येक तांड्यात गावांत पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून नक्कीच अशा प्रकारे नवोदित उपक्रम नक्कीच आपल्या ही तांड्यात गावांत सुरू करावे. रामनगर तांड्यातील सर्व ग्रामस्थांचे नितीन जाधव यांनी मनःपूर्वक जाहीर आभार मानले आहे.