रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणाच्या तपास कामात कर्तव्यात कसूर करून हलगर्जीपणा करणार्या सबंधित पोलीसांना तात्काळ निलंबित करून पुढील सखोल तपास करण्याची मागणी
गोर सेना, राष्ट्रीय बंजारा टायगर्स, सेवक युवा सेना, व रामदेववाडी ग्रामस्थ तरुण सामाजिक कार्याकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी, व पोलीस अधीक्षक यांना मागण्यांचे निवेदन.!
जळगाव : जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे ७ मे रोजी एक भीषण अपघात झाला होता. एक महिला आपली दोन मुलं आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. परंतू अपघातग्रस्त पीडित परिवाला योग्य न्याय मिळत नाहीये. त्याअनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्याआधी बंजारा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली असता अधीक्षक यांना सांगण्यात आले की, सबंधित प्रकरणात पोलीसांनी सुरवातीला केलेला तपास आणि उशिराने केलीली कारवाई पाहता कुठेतरी राजकीय दबावाखाली पोलीसांकडून आरोपींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे, कारण घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेल्या मुख्य दोन्ही आरोपींना जिल्हा रुग्णालयाला उपचारासाठी ऍडमिट न करता पारोळा येथे पाठवून मुद्दामहून उशिराने तिथल्या पोलीस स्टेशनला आरोपींचे ब्लड रिपोर्ट घ्यायला सांगितले गेले, हा सर्व प्रकार पाहता सबंधित पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना निलंबीत केले जावेत व पुढील सखोल तपास करून आरोपींना कडक शासन होऊन पिडीतांना न्याय मिळावा अशी मागणी केली असता, पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, यापुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवून उर्वरीत सखोल चौकशी केली जाईल, निवेदनात नमूद बाबींची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.