कल्याण : मोहने-आंबिवली येथील बंजारा समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज आणि देवी जगदंबा माता मंदिराच्या जागेवर कल्याण पश्चिम चे कार्यसम्राट आमदार-मा.विश्वनाथजी भोईर यांच्या स्थानिक विकास निधीतून भव्य अशा पत्री शेड च्या कामाचे उद्घाटन येथील शिवसेना शाखाप्रमुख-मा.रोहनभाऊ कोट यांच्याहस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची पुजा करुन आणि श्रीफळ वाढवून संपन्न झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण समाज तांडा समृद्धी योजनेचे ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य-कैलासभाऊ तंवर,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण, बंजारा समाज सेवा संस्थेचे ज्येष्ठ संचालक विठ्ठलभाऊ राठोड, धनराजभाऊ राठोड, बबलूभाऊ राठोड, सोमलू राठोड इ.मान्यवर उपस्थित होते.