कल्याण : बंजारा समाजाचा मोठा वर्ग कल्याण, ठाणे जिल्ह्यासह आंबिवली या भागात अनेक वर्षांपासून स्थायिक असून, लहुजीनगर, आंबिवली (पूर्व) येथील दीड गुंठे इतकी मोकळ्या जागेत असलेल्या "संत सेवालाल महाराज व जगदंबा माता यांची गुढी उभारून गेल्या ४० वर्षापासून बंजारा समाजाच्या वतीने पूजा अर्चना तसेच जयंती उत्सव साजरा करण्यात येत होता.
बंजारा समाजासाठी श्रेष्ठ मानले जाणारे दैवत "संत श्री. सेवालाल महाराज मंदिर" लहुजी नगर, मु. पो. मोहोने, आंबिवली (पूर्व), ता. कल्याण येथे १९८२ साली स्थापित मंदिर हे बंजारा समाजातील लोकांसाठी अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. सदर जागेवर असंख्य बंजारा समाजाचे लोक एकत्र येऊन नित्यनियमाने पूजा प्रार्थना करीत असतात. सदर मंदिरात १९८२ पासूनच बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात व जोमाने प्रत्येक वर्षी दि. १५ फेब्रुवारी रोजी साजरा करतात. तसेच गुरू पौणिमा, रामनवमी उत्सव सुद्धा सदर ठिकाणी साजरा करीत असतात. या ठिकाणी संपूर्ण ठाणे जिल्हा येथील बंजारा समाजाचे लोक हजारोच्या संख्येने पूजा प्रार्थना करतात म्हणून सदर ठिकाण बंजारा समाजासाठी पवित्र मानले जाते.
संत श्री. सेवालाल महाराज मंदिराची स्थापना मोकळ्या जागेत १९८२ साली झालेले असून सदर मंदिराचे शेडचे बांधकाम करण्यात आलेले नव्हते पण बंजारा समाजाच्या वतीने व भाजपा कल्याण तालुका सचिव कैलासभाऊ तंवर (अशासकीय सदस्य - संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजना, ठाणे) यांच्या अथक प्रयत्नाने सदर शेडच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. कैलाभाऊ तंवर सह बंजारा समाजातील मान्यवरांच्या वतीने वेळोवेळी मा. आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता, त्यांनतर विद्यमान आमदार मा. विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा करून सदरील काम पूर्णत्वात आले असून समाजाच्या वतीने कैलासभाऊ तंवर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मोहोने, यादव नगर, अटाळी, वडवली, आंबिवली येथे बंजारा समाजाची लोकसंख्या हे हजारोच्या संख्येने आहे व त्यांना आंबिवली या क्षेत्रात पूजेसाठी व त्याचे धार्मिक कार्यक्रम साजरा करणेसाठी सदर ठिकाण हे एकमेव आहे. म्हणून सदर मंदिराचे पक्के बांधकाम समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक आहे. जेणेकरून बंजारा समाजाचे लोक एकत्रित येऊन त्यांचे सण / उत्सव आनंदाने साजरा करू शकतील.
तसेच संत सेवालाल महाराज मंदिराच्या शेडचा पाठपुरावा करताना शंकर चव्हाण, डॉ. युवराज राठोड, विठ्ठल राठोड, धनराज राठोड, विजय राठोड, अशोक चव्हाण, सोमला राठोड, विक्रम चव्हाण, योगेश जाधव, सुरेश नाईक, किसन पवार, अनिता चव्हाण, सुनिल चव्हाण, पत्रकार सतिष एस राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
संत सेवालाल महाराज मंदिर निर्माण कार्यास हातभार लावण्यासाठी कृपया खाली दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून देणगी देऊन सहकार्य करावे.