अंबाजोगाई : महायुतीच्या बीड जिल्ह्याच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी अ.भा. बंजारा क्रांती दलाचे पदाधिकारी युवा नेते शरदभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील वस्ती-तांड्यावर जावून सर्व समाज बांधवांच्या गाठी-भेटी घेत आहेत. २०२४ ची ही बीड लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार असून लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना न भुतो न भविष्यती अशा मतांच्या लिडने भारताच्या सार्वभोमत्व संसदेत पाठविणार असल्याचे मत अ.भा. बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड यांनी व्यक्त केले.
दिन-दलित, बंजारा समाज, ओबीसी समाज तसेच अठरापगड जातींच्या घटकांच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पंकजाताई मुंडे या बीड लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार असून प्रथमच त्या लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. ताईसाहेबांची लोकसभेची ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार असून लाखों की लिड से पंकजाताई बीड से या उक्तीप्रमाणे त्या भारतीय संसदेत डेरेदाखल होणार आहेत.
त्यांच्या या निवडणूकीत बंजारा समाज पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरणार असून जिल्हाभरातील संपूर्ण तांडा-वस्तीवर जावून आम्ही पंकजाताईंसाठी मतदानरुपी आशिर्वाद मागणार असल्याचे शरदभाऊ राठोड यांनी सांगितले. दरम्यान, पंकजाताईंची उमेदवारी जाहीर झाल्यापासून जिल्हाभरातील अ.भा. बंजारा क्रांती दलाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे प्रचाराच्या कामाला लागले असून आपल्या लाडक्या नेतृत्वाला भारताच्या संसदेत पाठविण्यासाठी शरदभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत घेत आहेत. ताईसाहेबांकडे असलेल्या सर्वसमावेशक दृष्टीने आगामी काळात बीड जिल्हा विकसीत जिल्हा म्हणून भारताच्या नकाशावर झळकणार असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.