जिंतुर : जिंतुर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषेत मोहक नृत्य सादर करत होळीच्या रंगात रंग भरले.
या अनोख्या उत्सवात राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही सहभाग घेतला. बंजारा समाजाच्या भगिनींच्या आग्रहास्तव त्यांनी पारंपरिक वेष परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.
पारंपरिक लेंगी गीते, नृत्य आणि रंगोत्सवाच्या जल्लोषात होळी साजरी झाली. यावेळी राज्यमंत्र्यांनी समाजातील सकारात्मक बदल आणि एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत हा सांस्कृतिक सोहळा अधिक रंगतदार केला.
गणेशनगर तांडा,साईनगर तांडा,पिपंळगाव काजळे तांडा ता.जिंतुर
"होळी रे मारी बंबड भोळी
भर गेरीया रं मारी झोळी ये"
आज होळी, अंतर्मनातील कटुता, अनिष्ठ वृत्ती अन नकारात्मक विचारांचा जाळून सकारात्मक जीवनाचे रंग उधळण्याचा हा पवित्र सण, या होळीच्या निमित्ताने आज मतदारसंघातील आडगाव तांडा येथे बंजारा समाजाच्या भगिनींसोबत होळी साजरी केली. पारंपरिक नृत्य, लेंगी गीते, रंगोत्सव हे वैशिष्ट्य असलेली ही अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी महिला भगिनींसह नागरिक मोठ्या उत्साहाने हा उत्सवात सहभागी झाले होते.
बंजारा समाजाच्या भगिनींचे पारंपरिक वेष आणि विशिष्ट पद्धतीचे मोहक नृत्य मनाला भुरळ पाडणारे आहे. आज उत्सवात सहभागी होत असताना बंजारा समाजातील माता भगिनींच्या आग्रहास्तव पारंपरिक वेशात नृत्य करण्याचा आनंद घेतला. उपस्थित जनसमुदायला होळीच्या शुभेच्छा दिल्या व भविष्यात आनंद आणि उत्साहाने सकारात्मक ऊर्जेने एकसाथ काम करण्याचे आवाहन केले.
- मेघना सकोरे बोर्डीकर, राज्यमंत्री