ठाणे : महाराष्ट्राचे भाग्यविधाते तथा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्र राज्यचे 11 वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केले माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त १ ते ३१ जुलै संपूर्ण महिनाभर राज्यात 'वसंत महोत्सच्या' माध्यमातून ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवीला जात आहे. या महोत्सवाचा शुभारंभ धर्मनेता भगवंतसेवक किसनभाऊ राठोड यांच्या शुभहस्ते १ जुलै रोजी माजलगाव बीड येथून झाला आहे.महाराष्ट्रभर विविध ठिकाणी वसंत महोत्सव साजरा केल्यानंतर राष्ट्रीय बंजारा परिषद आणि सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समारोपचा कार्यक्रम मंगळवार ३० जुलै २०२४ रोजी दुपारी ३:३० ते ६:३० पर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे पश्चिम येथे श्री प्रकाश राठोड अध्यक्ष सेवा फाऊंडेशन यांनी आयोजित केला आहे.
त्या निमित्ताने गोरबोली (बंजारा भाषा) ८ वी अनुसूचित समाविष्ट करणे, महानायक वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार, आमदार यांचे सत्कार, बंजारा समाजातील नवउद्योजकांचे सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडणार असुन यां वसंत महोत्सवाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज, पोहराहदेवी श्री.संजयभाऊ राठोड मंत्री,महाराष्ट्र, धर्मनेता श्री.किसनभाऊ राठोड, श्री.विलासभाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्ष - राष्ट्रीय बंजारा परिषद तसेच प्रा.पी.टी.चव्हाण,जेष्ठ ओबीसी नेते बीजेपी, तसेच इतर बंजारा नेते व समाजसेवक उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार श्री.नरेश मस्के, कल्याणचे खासदार श्री.श्रीकांत शिंदे, आमदार श्री.निरंजन डावखरे आदी उपस्थिती असणार आहे.तसेच या महोत्सवात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव श्री.पंडितभाऊ राठोड, प्राचार्य श्रीमंत राठोड मुंबई, गोर नवनाथभाऊ चव्हाण तसेच युवा उद्योजक अनिल नाईक पुणे, नरेश राठोड मुंबई, गोविंद जाधव ठाणे, राम राठोड नवी मुंबई, राजेश राठोड नवीमुंबई आणि न्युरोसर्जन डॉ पूजा राठोड पुणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषद आणि सेवा फाऊंडेशनच्या वतीने महानायक वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या ठाणे रोड कॅडबरी जंक्शन येथे १ वाजता वसंतराव नाईक साहेब यांच्या फोटोला अभिवादन करून भव्य मोटार सायकल आणि ऑटो रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीत हजारो नाईक साहेब प्रेमी सहभागी होणार असुन बंजारा संस्कृती, डपडा नृत्य सादर केला जाणार आहे.तरी ठाणे व मुंबई परिसरातील सर्व समाज बांधवाना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषद आणि सेवा फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे.अशी माहिती राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रवक्ते गोर मिथुन राठोड यांनी दिली.