Breaking News

10/recent/ticker-posts

कल्याण येथे भा.बं.स.क.से.संस्था आयोजित वसंतराव नाईक जयंती सोहळा संपन्न

भा.बं.स.क.से.संस्था आयोजित वसंतराव नाईक यांच्या जयंती सोहळा संपन्न

गुणवंत व्हा यशवंत  व्हा !!

नाईक साहेबांचा आदर्श घ्या.!!!

कल्याण : आचार्य अत्रे कॉन्फरन्स हॉल मध्ये हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या १११ व्या जयंतीनिमित्ताने रविवार रोजी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या ठाणे मुंबई शहर कार्यकारणीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते. मुंबई व ठाणे परिसरातील विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा तर नवनियुक्त सरकारी नोकरीवर लागलेल्या समाजातील कर्मचाऱ्यांचा सन्मानासह विविध विभागांमध्ये सेवा देऊन सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी समाज बांधवांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.

भा.बं.स.क.से.संस्था आयोजित वसंतराव नाईक यांच्या जयंती सोहळा संपन्न

स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवणारे मा. मच्छिंद्र चव्हाण वाहतूक पोलीस कल्याण यांना सन्मानचिन्ह व बंजारा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‌रुग्णसेवक माननीय श्री रवी भाऊ राठोड यांना संस्थेच्या वतीने बंजारा गौरव पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले. समाजाचे खरे आधारस्तंभ तुम्हीच आहात समाजाचा कणा गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व यशवंत गुणवंत व उच्च शिखरावर मार्गक्रम करावे. उपस्थित मान्यवरांनी अशा स्वरूपाचे आशावाद व्यक्त केले. डॉ.व्यंकटेश भाऊ राठोड प्रदेशाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले.

अध्यक्ष भाषण मधून समाज आणि आपली सामाजिक बांधिलकी आपण कशी जपावी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मा. भिकन भाऊ जाधव सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मुंबई यांनी वि. जा प्रवर्गात होणाऱ्या बोगस घुसखोरीवर प्रकाश टाकला. मा. अंबरसिंग चव्हाण साहेब यांनी महानायक वसंतराव नाईक साहेब यांच्या कार्य व कर्तुत्वाला उजाळा दिला. सेवा गृपचे संचालक मा. मंगल भाऊ चव्हाण यांनी भविष्यात नोकरीच्या संधी उपलब्ध असणार नाहीत. त्यासाठी उद्योगाशिवाय पर्याय नाही असा संदेश दिला. भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त मा. सुदाम जाधव, मा. एकनाथ भाऊ राठोड माजी महासचिव हे उपस्थित होते. मुख्याध्यापक मा.अनिल भाऊ राठोड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून आजचे युग आणि स्पर्धात्मक जीवन यासंदर्भात मार्गदर्शन दिले. सूत्रसंचालन मा. विठ्ठल भाऊ पवार व मा. बळीराम भाऊ राठोड यांनी केले. या कार्यक्रमास ठाणे मुंबई परिसरातील संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन जाधव यांनी आभार प्रदर्शन करून अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भा.बं.स.क.से.संस्था आयोजित वसंतराव नाईक यांच्या जयंती सोहळा संपन्न

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाणे मुंबई परिसरातील शहर कार्यकारणी मधील परिश्रम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्था ही समाजातील विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना समाज बांधवांना प्रकाश झोतात आणण्याची काम निरंतर स्वरूपात करत असते. त्यामुळे नेहमी कौतुकाची थाप संस्थेवर दिले जाते. बंजारा समाजातील सर्व स्तरातून या कार्यक्रमाचा भरभरून कौतुक केला जात आहे.