तीज महोत्सवात बंजारा समाजाची काशी तथा धर्मपीठ म्हणून ओळखले जाणारे संतश्रेष्ठ प.पू सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ, पोहरादेवी संस्थान येथील धर्मपीठाधिश्वर प.पू.जितेंद्र महाराज, बंजारा समाजाचे स्टार गायक, मराठी इंडियन आयडॉल विजेते जगदीश भाऊ चव्हाण आणि धर्मवीर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. दिनकर अण्णा पाटील तसेच मान्यवर उपस्थित होते.
प्रथम अतिथींचे महिलांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. त्यानंतर बंजारा समाजाचे आराध्य दैवत याडी जगदंबा देवी मंदिर, जगतगुरु संत सेवालाल महाराज मंदिर यांची पूजा, भोग (नैवेद्य) आरती करण्यात आली. प.पु जितेंद्र महाराज धर्मपिठाधीश्वर धर्मपीठ पोहरादेवी तसेच महागायक जगदीश भाऊ चव्हाण, मनपा सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात श्री दिनकर अण्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की बंजारा समाज एकत्र कसा राहील यासाठी प्रयत्न करावे. समाजासाठी माती खाल्ली पाहिजे. समाज मोठा झाला तरच आपण मोठे होऊ असे प्रतिपादन केले आणि सर्व बंजारा बांधवांना शुभेच्छा दिल्या. प.पू.जितेंद्र महाराज यांनी श्री दिनकर अण्णा यांनी नाशिक महानगरात बंजारा समाजासाठी मंदिर बांधण्यासाठी भरभरून मदत केली त्याबद्दल आणाचे आभार मानले आणि त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजसेवक श्री अमोल दिनकर पाटील हे पण कार्यक्रमात उपस्थित होते. बंजारा समाजाचे पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यात सामूहिक नृत्य,गाणे पिडीया खोसणी, दोना खोसणे ,व तीज तोडणे इत्यादींचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष भाऊ राठोड यांनी केले. तीज उत्सवाबद्दल माहिती दिली.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साहेबराव राठोड यांनी केले व तीज महोत्सव साजरा करण्यामागचे पौराणिक महत्व विशद केले. श्री अरुणभाऊ राठोड यांनी गोर बंजारा तीजच्या बाबतीत सखोल माहिती दिली. श्री स्वप्निल भाऊ राठोड यांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या याबाबतीत विशेष मार्गदर्शन केले. श्री विजय भाऊ राठोड यांनी तीज व बंजारा संस्कृती बाबत सखोल मार्गदर्शन केले श्री सुरेश भाऊ जाधव यांनी तीजच्या बाबतीत मोलाचे असे मार्गदर्शन केले. व समाज कसे एकत्र राहील याबाबत माहिती दिली तसेच राजूभाऊ चव्हाण यांनी सुद्धा तीज बाबतीत माहिती व मार्गदर्शन केले. तसेच या तीज उत्सव कार्यक्रमासाठी श्री ओंकार जाधव यांनी तीज व सांस्कृतिक कार्यक्रम यावर माहिती दिली व मार्गदर्शन केले. श्री सलतान राठोड यांनी सुद्धा तीज व सांस्कृतिक बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गोर बंजारा सार्वजनिक तीज महोत्सव म्हणजे महिलांसाठी अतिशय आनंदाचे वातावरण होते. महिलांनी वेगवेगळे प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतले.
गोर बंजारा सार्वजनिक तीज महोत्सव समिती 2024 या महोत्सवासाठी श्री.अरुण भाऊ राठोड, श्री रविभाऊ रावडी राठोड, श्री. स्वप्निल भाऊ राठोड, श्री राजूभाऊ चव्हाण, श्री संतोष भाऊ राठोड, श्री साहेबराव भाऊ राठोड, सुरेश भाऊ जाधव, श्री व विजय भाऊ राठोड, श्री ओंकार भाऊ जाधव, श्री बाळासाहेब पवार, श्री दगडू राठोड, श्री वामन भाऊ चव्हाण, श्री भास्कर चव्हाण, श्री योगेश भाऊ राठोड, श्री निलेश भाऊ पवार, श्री तात्या भाऊ पवार तसेच महिला भगिनी नंदाताई मथुरे सुरेखाताई राठोड, पूजाताई राठोड व चव्हाण ताई सर्व बंजारा बांधव, यांनी अथक मेहनत व परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
माता, भगिनी, सर्व देणगीदार, सर्व स्वयंसेवक, सर्व सहकारी, केटरिंग, मंडप, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे तिज उत्सव समितीच्या वतीने अगदी मनापासून आभार मानण्यात आले.