नवी दिल्ली : आज मंगळवार दि. ०४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भिकनभाऊ जाधव व मराठवाडा संघटक अंजेभाऊ चव्हाण यांनी नवी दिल्ली येथे सडक परिवहन मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची भेट घेतली. तसेच नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयाला देखील भेट दिली असता भारतीय जनता पक्षाचे संघटन महामंत्री मा. बी. एल. संतोष यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सामाजिक विषयावर चर्चा केली.
सदर भेटीदरम्यान बंजारा समाजाच्या विविध मागण्या, विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, गोरबोली भाषेला मान्यता देऊन एका सूचित आणणे, कर्नाटकासह देशातील बंजारा समाजाला भाजपा शी जोडण्यासंबंधी तसेच समाजाच्या महत्वाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
त्याच प्रमाणे भारतातील समस्त बंजारा समाजाला एकाच छताखाली आणून समानतेचा न्याय आणि समानतेचा अधिकार मिळण्यासाठी सहकार्य करुन एस टी प्रवर्गात समाविष्ट करावेत असेही मत मांडले तसेच धर्मनेता मा. किसनभाऊ राठोड यांनी निर्माण केलेल्या १२ धर्मपीठास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा या संदर्भात लेखी निवेदन सादर करण्यात आले.