Breaking News

10/recent/ticker-posts

रामेश्वरभाऊ नाईक यांच्या कर्तृत्वान नेतृत्वात बंजारा समाजामुळे महायुती सरकार भरघोस मताने विजयी - पंडित भाऊ राठोड

 

रामेश्वरभाऊ नाईक यांच्या कर्तृत्वान नेतृत्वात बंजारा समाजामुळे महायुती सरकार भरघोस मताने विजयी - पंडित भाऊ राठोड

मुंबई : गोर  बंजारा समाजाचे धर्मसत्ता, राजसत्ता मजबूत करणारे संस्कृति रुढी परंपराचे संवर्धन करणारे व गोर बंजारा व लमाना समाज यांच्या समृद्धीसाठी गोदरी कुंभाचे आयोजन करून देशभरामध्ये समाजाचा सन्मान वाढवणारे व अनेक राष्ट्रीय संत गोरबंजारा समाजाच्या व्यासपीठावर आणून समाजाला प्रबोधन करणारे रामेश्वर भाऊ नाईक हे  गोर बंजारा समाजातील गळ्यातील ताईत बनले आहेत. गोर बंजारा धर्मपीठ सर्व साधुसंत व सामाजिक कार्यकर्ते अनेक संघटना रामेश्वर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करत आहेत. रामेश्वर भाऊ यांच्या माध्यमातून संत सेवालाल महाराज  बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना संपूर्ण राज्यभर कार्यान्वित झाली असून जिल्हा आणि प्रत्येक  तालुक्यातील अशासकीय सदस्यांनी या निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये करुन विजय खेचून आणलेला आहे. 

रामेश्वरभाऊ नाईक यांच्या कर्तृत्वान नेतृत्वात बंजारा समाजामुळे महायुती सरकार भरघोस मताने विजयी - पंडित भाऊ राठोड

गोर बंजारा तीर्थक्षेत्र पोहरादेवी  येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आणून तसेच संत संमेलनासाठी योगी आदित्यनाथ यांना पोहरादेवी येथे आणून गोरबंजारा समाजाचा सन्मान वाढवलेला आहे. गोर बंजारा समाजासाठी अहोरात्र झटणारे आणि आरोग्यदूत म्हणून आपली स्वतःची छाप असणारे रामेश्वर भाऊ नाईक हे समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास करु शकतात याचा विश्वास गोर बंजारा समाजातील सर्वच लहान मोठ्या पदाधिकाऱ्यांना वाटते.

गोर बंजारा समाजातील तांड्यांपर्यंत संपर्क असणारा हा नेता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोर बंजारा समाजाला अधिक मजबूत करण्याचं काम करेल याचा विश्वास वाटतो. या  निवडणुकीमध्ये रामेश्वरभाऊ नाईक यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा त्यांच्या माध्यमातून संत प्रवास, सर्व संघटनांचा समन्वयक आणि तळागाळातील लोकांपर्यंत महायुतीचे विचार पोहोचवण्याचं कार्य यामुळे गोरबंजारा समाज एक संघ राहून बंजारा समाजाने एक गटा मतदान महायुतीच्या बाजूने केलेल्या आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आज बंजारा समाजामुळे महायुतीचे सरकार सत्तेत आलेले आहे. कर्तुत्वान नेतृत्व असलेल्या रामेश्वर भाऊंनी समाजाचा सन्मान वाढवला आहे.