हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतरावजी नाईक साहेब जयंती निमित्त आज १ जुलै कृषी दिनी बंजारा जनजागृती विचार मंच चाळीसगाव तर्फे वृक्षारोपण व सामाजिक विषयांवर विचारमंथन चर्चा सत्र कार्यक्रम उत्कृष्टरीत्या पार पडले.
चाळीसगाव : संत सेवालाल महाराज विचार प्रबोधनी सेंटर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात जेष्ठ मार्गदर्शक तथा बंजारा एकीककरण महा समितीचे अध्यक्ष देवेंद्र डी. नाईक ह.भ.प. काशिनाथ माऊली यांच्या हस्ते सर्वानुमते प्रथम नाईक साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, उपस्थित सर्वांनी नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.
तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे तथा सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक विषयावर विचारमंथन चर्चा सत्र कार्यक्रमात सहभाग घेऊन समाजाच्या विविध विषयांवर निर्णायक असे विचार मांडले, नाईक साहेबांच्या जिवण कार्यावर जेष्ठ मंडळींनी आपली मनोगते मांडली जवळपास दोन ते अडीच तास समाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रामुख्याने दोन विषयांवर निर्णय घेण्यात आले.
१) कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव च्या प्रवेशद्वारावर वसंतरावजी नाईक साहेबांचा पुर्णाकृती पुतळा व्हावा व बाजार समितीला नाईक साहेबांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना जेष्ठ मार्गदर्शक तथा सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त समाज बांधवांनी एकत्र येऊण संघटीतरीत्या वाटचाल करणे असा निर्णय घेऊन येत्या आठवड्यात या विषयावर समाजातील सर्व घटकांना बोलावून नियोजन करण्यात संदर्भात निर्णय घेण्यात आले.
२) लोकवर्गणीतून शहराच्या ठिकाणी जागा घेऊन संत सेवालाल महाराज बंजारा भवन निर्माण कार्यासाठी समाजातील सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठकी घेऊन कार्यकारणी समितीची स्थापना करणे यावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थितीत बंजारा एकीकरण समितीचे जेष्ठ मार्गदर्शक अध्यक्ष देवेंद्र डी. नायक ह.भ.प. काशिनाथजी माऊली , कांतिलाल राठोड, मोहन राठोड, चत्रू राठोड, चिंतामण चव्हाण, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. भरत चव्हाण, राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे सरचिटणीस अनिल भाऊ पवार , सामाजिक न्याय विभाग क्रॉग्रेस जिल्हा अध्यक्ष ॲड. अविनाश आर. जाधव, रोटरी क्लबचे सदस्य सुभाष जाधव, रामदेव राठोड , संत सेवालाल महाराज प्रबोधिनी सेंटर चे संचालक व पत्रकार योगेश्वर राठोड, उ.बा.ठा. गटाचे सामाजिक कार्यकर्ते भिमराव जाधव, संत सेवालाल जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय राठोड शिंदे गट शिवसेनेचे युवा जिल्हा उपप्रमुख संदीप राठोड, तोळाराम राठोड, अनिल पेंटर , अरविंद राठोड विकास राठोड, समाधान राठोड , आदि कार्यकर्ते उपस्थित होते.