पाचोरा : बंजारा ब्रिगेड व मंगलचरणम फाउंडेशनच्या वतीने पाचोरा शहरात बंजारा भवन व अवी ऍम्ब्युलन्स सर्विसेसचे उद्घाटन बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांतभाऊ राठोड यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दि.२६ मे रविवार रोजी संपन्न झाले. बंजारा समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय न्याय - हक्क अधिकारासाठी रविकांतभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा ब्रिगेड ही सामाजिक संघटना कार्यरत असुन याचाच एक भाग म्हणून पाचोरा शहरात बंजारा भवन या जनसंपर्क जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे डॉ. अरविंदभाऊ पवार प्रदेश उपाध्यक्ष, बंजारा ब्रिगेड यांच्या मार्गदर्शनाखली मुंबई, नागपूर आणि आता पाचोरा शहरात अवी ऍम्ब्युलन्स सर्विसेसचा पुढचा पाऊल टाकत पाचोरा शहरात ऍम्ब्युलन्स सेवेचाही शुभारंभ करण्यात आले.
यावेळी रविकांतभाऊ राठोड यांनी बंजारा भवन कार्यालयाचे उद्घाटन सोबतच अवी ऍम्ब्युलन्स सेवेचाही शुभारंभ करत शुभेच्छा दिल्या. तसेच याप्रसंगी मोहाडी व आंबेवडगांव तांडा येथेही रविकांतभाऊ राठोड यांनी सदिच्छा भेट देत तांडावासियांशी हितगुज साधले. सोबत डॉ. अरविंद पवार, प्रदेश उपाध्यक्ष, डॉ. मुकेश राठोड मराठवाडा अध्यक्ष, ॲड. भरत चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, भीमराव जाधव, योगेश जाधव, श्रीराम राठोड, लक्ष्मण जाधव आदी पदाधिकारी व सहकारी यावेळी उपस्थिती होते.