Breaking News

10/recent/ticker-posts

प्रसिद्ध गोर बंजारा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रा.सी.के.पवार व सौ. मालिनी पवार लोकशाही पुरस्काराने सन्मानित !

प्रसिद्ध गोर बंजारा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रा.सी.के.पवार व सौ. मालिनी पवार लोकशाही पुरस्काराने सन्मानित !

मुंबई : लोकशाही मराठी वृत्तवाहिनी (चॅनल) तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान अनेक कार्यक्रमांतून विविध प्रसंगी केला जातो. तसेच ७ एप्रिल रोजी देखील पंचतारांकित हॉटेल ऑर्चिड एअरपोर्ट मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गोर बंजारा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रा.सी.के.पवार व त्यांच्या धर्मपत्नी उपप्राचार्य सौ. मालिनी पवार या दोघांना लोकशाही मराठी न्यूज वृत्तवाहिनी तर्फे प्रसिद्ध चित्रपट कलाकार, निर्माता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते व हास्य जत्रा विनोदी कलाकार समीर चौघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

प्रसिद्ध गोर बंजारा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रा.सी.के.पवार व सौ. मालिनी पवार लोकशाही पुरस्काराने सन्मानित !

प्रसिद्ध गोर बंजारा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रा.सी.के.पवार व त्यांच्या धर्मपत्नी उपप्राचार्य सौ. मालिनी पवार यांनी बंजारा समाजातील पहिला बॉलीवूड चित्रपट संत सेवालाल तसेच पहिले बंजारा संगीत नाटक नवलेरी वेतडू व बंजारा समाजातील सांस्कृतिक प्रचार-प्रसार व विविध सामाजिक सेवाकार्य करत असतात.

प्रसिद्ध गोर बंजारा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक प्रा.सी.के.पवार व सौ. मालिनी पवार लोकशाही पुरस्काराने सन्मानित !

या कार्यक्रम सोहळाप्रसंगी प्रसिद्ध विनोदी व नाटक कलाकार अंशुमन विचारे व लोकशाही वृत्तवाहिनीच्या वृत्त निवेदिका राघवी सावंत यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.