Breaking News

10/recent/ticker-posts

बंजारा समाजाच्या MBA विद्यार्थ्याची यशोगाथा, मुकेश चव्हाणला ११.२५ लाख रुपयांचे पॅकेज !


Motivation News : बंजारा समाजाच्या MBA विद्यार्थ्याची यशोगाथा, मुकेश चव्हाणला ११.२५ लाख रुपयांचे पॅकेज !


आई - वडिलांचा आशिर्वाद , महाविद्यालयात शिक्षण, शिक्षकांच मार्गदर्शन, प्लेसमेंटची संधी, मित्रांची साथ आणि प्रामाणिक मेहनत मला कामी आल्याचे मुकेश यांनी सांगितले आहे.

पुणे : सध्या महाविद्यालयात प्लेसमेंटचा हंगाम सुरू आहे. पुण्यातील नामांकित MBA विद्यालयांपैकी RIIM - AIBM येथे MBA चे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने महाविद्यालयाच्या कॅम्पस मुलाखतीतून उज्जीवन बॅंकेत प्लेसमेंट मिळवली आहे. दरम्यान बॅंकेने मुकेशला ११.२५ लाखाच वार्षिक पॅकेज ऑफर केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील लासुरा तांडा (जामनेर) या छोट्याशा गावातला रहिवासी असलेला आणि RIIM - AIBM पुणे येथे सध्या तो या नामांकित महाविद्यालयात व्यवस्थापनात पदव्युत्तर MBA च शिक्षण घेत आहे. MBA च्या द्वितीय वर्षी त्याला ही ऑफर मिळाली आहे.

मुकेश यांनी आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रात मेहनत, उत्साह आणि अद्याप सकाळची जिद्द सामावलेली आहे. त्यांच्या प्रयत्नांच्या प्रमाणात उज्जीवन बँकेत त्यांना नोकरी मिळाली आहे.

मुकेशच्या यशाच्या प्रतिक्रियेनंतर, RIIM-AIBM कॉलेजमध्ये प्लेसमेंट्ची नियमित व्यवस्था, व्यावसायिक शिक्षण व तत्परतेची चर्चा विद्यार्थ्यांसाठी आदर्श असेल असे सांगितले जात आहे.

मुकेशच्या यशाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. आई - वडिलांचा आशिर्वाद , महाविद्यालयात शिक्षण, शिक्षकांच मार्गदर्शन, प्लेसमेंटची संधी, मित्रांची साथ आणि प्रामाणिक मेहनत मला कामी आल्याचे मुकेश यांनी सांगितले.