कल्याण : आरोग्यदूत म्हणून राज्यभर नावलौकिक असणारे रामेश्वरभाऊ नाईक, कक्ष प्रमुख - राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष, उप मुख्यमंत्री कार्यालय यांना उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे दिला जाणारा या वर्षीचा "खान्देश भूषण" पुरस्कार जाहीर झाला असून कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. सुमित्राताई जाधव, सामाजिक कार्यकर्ता व सरपंच कैलासभाऊ पवार, सामाजिक कार्यकर्ता कैलासभाऊ तंवर, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता उत्तमभाऊ राठोड यांनी रामेश्वरभाऊ नाईक यांना "खान्देश भूषण" पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
रामेश्वरभाऊ नाईक यांनी कायम सामान्य माणसाच्या हितासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहे. त्यांनी केलेल्या पथदर्शी कार्याचा सन्मान म्हणूनच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे असे कैलासभाऊ पवार म्हणाले.
या संदर्भात कैलासभाऊ तंवर यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले कि, रामेश्वरभाऊ नाईक हे आरोग्यदूत म्हणून जनसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर कार्यरत असतात. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत देश हा त्यांचे कार्यक्षेत्र राहिला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील त्यांचे आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान आहे.
सौ. सुमित्राताई जाधव यांनी आरोग्यदूत रामेश्वरभाऊ नाईक यांनी भरीव कामगिरी केली असून सामान्य माणसाच्या हितासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणूनच त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे प्रतीक म्हणून रामेश्वरभाऊ नाईक यांना हा खान्देश भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे असे उत्तमभाऊ राठोड म्हणाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.