Breaking News

10/recent/ticker-posts

संत सेवालाल गोर बंजारा समितीतर्फे संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती साजरी


दिवा (ठाणे) : संत सेवालाल गोर बंजारा समिती दिवा शहर आयोजित श्री संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती दिवा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी संपूर्ण दिवा शहरात भव्य रॅली काढण्यात आली. त्यावेळी दिवा शहरातून बंजारा समाजाने संत सेवालाल महाराजांची वाजत-गाजत शोभायात्रा काढली. दिवा पूर्वेतील चौका जवळील मैदानात संत शिरोमणी सेवालाल महाराज, रामराव महाराज व आई जगदंबा माता यांचा भोग विधी कार्यक्रमात होमहवन करण्यात आले तर तेथे जमलेल्या नागरिकांसाठी महाप्रसादाची सोय केली होती. तसेच शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बंजारा समाजाचा पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच बंजारा समाजाचे अनेक प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव पाठीशी राहू असे प्रतिपादन माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रमास माजी आमदार सुभाष भोईर, इमारत विकासक सीताराम राठोड, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक दीपक जाधव, विभागप्रमुख चरणदास म्हात्रे, भालचंद्र भगत, उबाठा दिवा शहर अध्यक्ष सचिन पाटील, व्यापारी संघटनेचे चेतन पाटील, दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर, बालाजी कदम, संभाजी कदम, अनिल भगत, कुणाल पाटील, अरुण म्हात्रे, इमारत विकासक नामदेव राठोड, वासू राठोड, चंदर राठोड, देवा राठोड, पांडू राठोड, सुनिल राठोड, संत सेवालाल गोर बंजारा समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार श्यामसुंदर राठोड, समिती सदस्य विजय पवार, मिथुन आडे, प्रविण राठोड, चंदू चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार श्यामसुंदर राठोड यांनी उपस्थित मान्यवरांनाचे स्वागत केले. तसेच संत सेवालाल गोर बंजारा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.