Breaking News

10/recent/ticker-posts

७ वर्षानंतर साकार होणार पिंपळगांव कमानी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचा भव्य दिव्य समाजमंदिर तथा सभामंडप

७ वर्षानंतर साकार होणार पिंपळगांव कमानी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचा भव्य दिव्य समाजमंदिर तथा सभामंडप, मा.ना.गिरीशभाऊ महाजन भुमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार

७ वर्षानंतर साकार होणार पिंपळगांव कमानी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचा भव्य दिव्य समाजमंदिर तथा सभामंडप

६ मार्च रोजी मा.ना.गिरीशभाऊ महाजन आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते भव्य भुमीपूजन सोहळा

गावातील दानशूर मा.मल्लू चव्हाण, अजय चव्हाण, रविंद्र चव्हाण यांनी दिली ३ गुंठा जागा


प्रतिनिधी : अशोकराव चव्हाण

जामनेर :  पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथील बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज व देवी जगदंबा माता मंदिराच्या सभामंडप (समाजमंदिर) बांधून मिळावे या मागणीसाठी गेल्या ७ वर्षापासून जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकभाऊ चव्हाण आणि सर्व संचालक मंडळ तथा तत्कालीन सरपंच सौ. कविता अर्जून राठोड, मा.ग्रा.पं. सदस्य प्रल्हादभाऊ चव्हाण यांनी राज्याचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यमान ग्रामविकास तथा पर्यटन व वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे संत सेवालाल महाराज जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात मागणी केली होती.

७ वर्षानंतर साकार होणार पिंपळगांव कमानी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचा भव्य दिव्य समाजमंदिर तथा सभामंडप, मा.ना.गिरीशभाऊ महाजन भुमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार

या मागणीचा सतत गेली ७ वर्षे पाठपुरावा करीत आल्याने मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांनी यावर्षी या सभामंडप च्या सभागृह साठी मंजुरी दिली आहे.आणि या सभामंडप बांधकाम चे भुमीपूजन येत्या ६'मार्च २०२४,बुधवार रोजी  सकाळी-१०ः०० वाजता संत सेवालाल महाराज,आई जगदंबा देवीच्या मंदिरावर भव्य असा भुमीपूजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत प्रशासन तर्फे करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे असे की, या भव्य अशा सभामंडप ला लागणारी जागा ही गावातील दानशूर मा.मल्लू गबरु चव्हाण, मा.अजय गबरु चव्हाण आणि मा.रविंद्र गबरु चव्हाण या तिन्ही भावांनी सहज उपलब्ध करुन दिली आहे.

या भव्य अशा सभामंडप तथा समाजंदिराचा भुमीपूजन सोहळा तालुक्याचे लोकप्रिय व लाडके आमदार तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री-ना.गिरीषभाऊ महाजन, नगरपरिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मा.सौ.साधनाताई गिरीशभाऊ महाजन, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा मा.डॉ.केतकीताई पाटील, भाजपा नेते मा.संजयदादा गरुड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.निलेशभाऊ चव्हाण सर, तालुकाध्यक्ष-समाधान बाविस्कर, पोलिस पाटील इंदलभाऊ चव्हाण, नायक भोजराज राठोड, तुकडू नाईक, रामदेवजी बाबा मंदिर, पुजारी मा. मदन महाराज, माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक मा.शेषमलजी राठोड, मा.रतनजी चव्हाण तथा सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते भव्य असे समाजमंदिर सभागृह भुमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी पिंपळगांव कमानी येथील सर्व समाजबांधव तसेच परिसरातील समाजबांधव यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती द्यावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.प्रियंकाताई ताई चव्हाण, उपसरपंच संदिपभाऊ राठोड, ग्रा.पं.सदस्या मा.सौ.सईबाई चव्हाण, मा.सौ.अनुसया चव्हाण, मा.सौ.तारावंती राठोड, मा.कैलासभाऊ चव्हाण, चेतनभाऊ चव्हाण यांनी केले आहे.