Breaking News

10/recent/ticker-posts

मोहिनी नाईक यांना महिला सेवा पुरस्कार प्रदान

मुंबई : आठ मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत असतो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच. कारण याच दिवशी अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात.

जागतिक महिला दिन (International Women’s Day 2024) म्हणजे महिलांच्या कामाच्या, त्यांच्या कतृत्त्वाचा सन्मान कऱण्याचा दिवस. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी आणि दुसरीकडे स्वत:चे स्थान सिद्ध करण्यासाठी तिची असणारी धडपड आपण सगळेच पाहतो. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा महिला सेवा पुरस्कार देऊन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गौरव करण्यात आला. त्यामध्ये आमदार इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी मोहिनी नाईक यांना महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी केलेल्या विविध कार्यासाठी महिला सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


या पुरस्कार वितरण सोहळ्यास पश्चिम रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकारी मंजुळा सक्सेना तसेच आमदार इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.