कल्याण : बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती जयंतीनिमित्त माजी आमदार कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख मा. नरेंद्र पवार, भिमराव नायक, आत्माराम जाधव, कैलास तंवर, अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
सेवालाल न्यूजचे यूट्यूब चॅनेल १ फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत असून बंजारा समाज बांधवांपर्यंत समाजातील होणाऱ्या घडामोडी समाजापर्यंत अधिक पोहोचावी या हेतूने सेवालाल न्यूज पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
सेवालाल न्यूज पोर्टलचे संपादक सतिष एस राठोड यांना पत्रकारिता क्षेत्राचा १८ वर्षाचा अनुभव असून ते २००५ पासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात डिप्लोमा तसेच डिग्री शिक्षण घेतले असून त्याचा फायदा बंजारा समाजातील गरजू व्यक्तींना व्हावा या हेतूने ते नेहमी प्रयत्न करत असतात. सेवालाल न्यूज पोर्टलच्या माध्यमातून काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळेल व समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी होईल असे त्यांचे मत आहे.
पत्रकार राठोड यांनी सेवालाल न्यूज यूट्यूब चॅनेलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे सेवालाल न्यूज पोर्टलला देखील प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा केलेली आहे.