कल्याण : बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती १५ फेब्रुवारी रोजी भवानी नगर, कल्याण येथे साजरी करण्यात आली. तसेच संध्याकाळी चार वाजता साई चौक खडकपाडा येथून पालखी मिरवणूकीला सुरुवात झाली व सात वाजता भवानी चौक येथे कार्यक्रमाच्या नियोजित ठिकाणी मोठ्या उत्साहात पालखी आणण्यात आली.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख मा. नरेंद्र पवार, भिमराव नायक, आत्माराम जाधव, कैलास तंवर, अशोक चव्हाण, रामभाऊ व इतर मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले
तसेच बंजारा विद्यार्थीनींच्या वतीने पारंपरिक वेशभूषा परिधान करुन सांस्कृतिक नृत्य तसेच संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर छान अशी माहिती देखील सादर करण्यात आली.
संत सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम या कल्याण नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत असून आनंद होत असल्याची भावना माजी आमदार मा. नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे.
तसेच कार्यक्रमात उपस्थित मान्यवर मा. आत्माराम जाधव यांनी समाजावर होणारा अन्याय व अरक्षणातील घुसकोरी बद्दल मत व्यक्त केले. तसेच समाजातील तरुणांना सांस्कृतिक, क्रीडा तसेच कलाकारांना चित्रपट क्षेत्रात वाव मिळावा यासाठी मार्गदर्शन करून सर्वोतोपरी मदत करायला पाहिजे.
डॉ. युवराज राठोड यांनी आपले मत व्यक्त करतांना महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संत श्री सेवालाल महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा होत असल्याचे सांगितले.
तसेच माजी आमदार नरेंद्र पवार, भिमराव नायक, आत्माराम जाधव, कैलास तंवर, अशोक चव्हाण, रामभाऊ कैलास तंवर, विजय राठोड (एम डी - जी प्लस हार्ट हॉस्पिटल), भरत नाईक, सुनिल उतेकर, मोरसिंग राठोड, गणेश घोलप, अशोक राठोड, वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, सुरेश शेठ, विश्राम राठोड, तानाजी राठोड, रमेश राठोड ग्रामसेवक, प्रतिक पेणकर, नाना जाधव सह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जय सेवालाल बंजारा समाज रिक्षा चालक सुदाम राठोड, संभाजी जाधव, सुभाष चव्हाण, अरुण तंवर, गोकुळ पवार, ज्ञानेश्वर राठोड, साहेबराव राठोड, दाद्या मामा, विजय पवार, सुपडू राठोड, अनिल राठोड यांनी परिश्रम घेऊन अतिशय छान अश्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केले होते.
संत श्री सेवालाल महाराज जयंतीचे संपूर्ण लाईव्ह कार्यक्रम पहा...