Breaking News

10/recent/ticker-posts

वांद्रे येथील भाभा रुग्णालय येथे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

वांद्रे येथील भाभा रुग्णालय येथे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी : अशोकराव चव्हाण 

मुंबई : मुंबई वांद्रे (प.) येथील के. बी. भाभा रुग्णालय येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था आणि भाभा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने बंजारा समाजचे आराध्य दैवत, युगपुरुष तथा क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८५ जयंती समारोह अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

वांद्रे येथील भाभा रुग्णालय येथे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

         यावेळी रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजयजी पाटील साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर रुग्णालयाचे अधिसेविका सौ.वृंदा संखे, वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिसा शेख मॕडम, वरिष्ठ भुलतज्ञ डॉ. वरुणजी नाईकसाहेब, समयलेखक रामचंद्र तावडेसाहेब हे उपस्थित होते.

वांद्रे येथील भाभा रुग्णालय येथे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

     उपस्थित मान्यवरांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले आणि शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजयजी पाटील साहेब यांनी क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली.

वांद्रे येथील भाभा रुग्णालय येथे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

    यावेवेळी रुग्णालयामधील सर्व कर्मचारी, अधिकारी,डॉक्टर्स, परिचारिका व तंत्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तथा प्रास्ताविक जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकभाऊ चव्हाण यांनी केले तर, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते तथा बृहन्मुंबई महापालिकेतील कर्मचारी मा .विष्णूभाऊ पवार, मणिलाल राठोड यांनी परिश्रम घेतले.

वांद्रे येथील भाभा रुग्णालय येथे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची २८५ वी जयंती उत्साहात साजरी

     कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारी आणि मान्यवर यांचे समाजसेवक मा.बालाजी पवार यांनी आभार मानले.