Breaking News

10/recent/ticker-posts

उद्या गोर बंजारा समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन

उद्या गोर बंजारा समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन

» उपवर वधू आणि विधवा, विधुर, घटस्फोटीत तथा दिव्यांगांनी निशुल्क मेळाव्याचे लाभ घ्यावे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : महाराष्ट्र राज्यामध्ये निवासाला असलेल्या गोर बंजारा समाज बांधवांनी आपल्या कुटुंबातील, नात्यातील आणि परिचयाच्या समाज बांधवांच्या घरात विवाह योग्य असलेल्या उपवर वधू आणि काही कारणांनी घटस्फोट झालेल्या तथा दिव्यांग असणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय निशुल्क विवाह मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. पांढरे वादळ आंदोलनाचे संयोजक दत्ताभाऊ राठोड यांच्यावतीने गोर बंजारा समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन उद्या २५ फेब्रुवारी रोजी भानुदास चव्हाण सभागृह रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

उद्या गोर बंजारा समाजाचा राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन
समाज बांधवांच्या कुटुंबांमध्ये उपरोक्त प्रकारचे वधू-वर असतात ज्यांना अनुरूप वर अथवा वधू मिळण्यास आजच्या धावपळीच्या युगात मोठ्या अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन बंजारा समाजाचे नेते दत्ताभाऊ राठोड यांनी सामाजिक दायित्वातून उपरोक्त मेळाव्याचे आयोजन केले आहे. समाजातील उपवर वधू आणि विधवा, विधुर, घटस्फोटीत आणि दिव्यांग असणाऱ्या विवाह इच्छुकांच्या पालकांनी ८०५५८ ८८८५५ या मोबाईल क्रमांकावर आवश्यक ती माहिती पाठविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सेवालाल न्यूज YOUTUBE चॅनेलला सब्सक्राइब करण्यासाठी क्लीक करा.